Wednesday, June 6, 2012

Shivrajyabhishek 2012


किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३३८ वा शिवराज्याभिषेक तारखेनुसार मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं रायगडावर आज या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

कोल्हापुरचे युवराज संभाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून हजारो शिवप्रेमी गडावर दाखल झाले आहेत.

राजदरबारातील मेघडंबरीत असलेल्या पुतळ्यावर महाराष्ट्रातल्या पंच नद्यातून आणलेल्या पाण्यानं जलाभिषेक, दुग्धाभिषेक, मुद्राभिषेक करण्यात येणार आहे. पारंपरिक वेशभूषेतील मावळे, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं, ढोल ताशांचा गजर आणि पालखी मिरवणूक हे या सोहळ्याचं खास वैशिष्टय आहे

Tuesday, April 19, 2011

Shivrajyabhishek 6 June 2011

रायगडावरील शिवराज्याभिषेक यंदापासून शासनातर्फे..
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, April 19, 2011 AT 08:28 AM (IST)

पुणे - तमाम शिवभक्तांची पंढरी असणाऱ्या रायगडावर या वर्षीपासून शिवराज्याभिषेक उत्सव शासनातर्फे साजरा केला जाईल, अशी घोषणा राज्याचे जलसंपदामंत्री व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी सोमवारी केली. शिवराज्याभिषेक व शिवपुण्यतिथीला एकत्र येत राज्यभरातील शिवप्रेमी रायगडावर इतिहासाचा जागर मांडतात. तटकरे यांच्या घोषणेने "शासनाला जेव्हा जाग येते' अशीच भावना गडावर जमलेल्या शिवप्रेमींनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 331व्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक स्थापित "श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा'तर्फे आयोजिण्यात आलेल्या शिवपुण्यतिथी कार्यक्रमात तटकरे बोलत होते. आमदार भरत गोगावले, शिवसंग्रामचे विनायक मेटे, मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम, कार्यवाह सुधीर थोरात, शाहीर योगेश, सेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयवंत मोहिते, अमित बर्वे या प्रसंगी उपस्थित होते. तटकरे म्हणाले, ""दुर्ग शिवनेरीवर शिवजन्मोत्सव शासनातर्फे साजरा केला जातो. त्याच धर्तीवर या वर्षीपासून शासनातर्फे शिवराज्याभिषेक साजरा केला जाईल. पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात किल्ले व स्मारके असल्याने शासनाला काही करता येत नाही. गेल्या अर्थसंकल्पात तरतूद केल्याप्रमाणे रायगडाच्या परिसरात शिवसृष्टी उभारण्याचा प्रकल्प लवकरच सुरू केला जाणार आहे. रायगड हा शौर्याचे प्रतीक आहे. गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी जिल्हा नियोजन मंडळ पाचाडच्या परिसरात भक्तनिवासाची सोय करेल. रायगड स्मारक मंडळाने जमविलेले दहा लाख रुपये इतर कामासाठी वापरावेत.''

Wednesday, September 22, 2010

शिवरायांचा दुसरा शाक्त शिवराज्याभिषेक - रायगडावर कार्यक्रमाचे आयोजन - २४ सप्टेम्बर २०१०

शिवाजी महाराजानी ६ जून १६७४ च्या राज्याभिषेकानंतर शाक्त पद्धतीचा दुसरा शिवराज्याभिषेक २४ सप्टेम्बर१६७४ रोजी केला होता..

ह्या राज्यभिषेकाचे पौराहित्य संभाजी राजानीशाक्त तंत्रानुसार केले होते..व त्यानंतर त्यांनी बुधभूषणं हा राजनीती वरील ग्रंथ रचला होता...





ह्या शाक्त शिवराज्याभिषेकाचे औचित्य साधून ह्या वर्षी शिवप्रेमी संघटनांच्या वतीने २४ सप्टेम्बर २०१० ला ह्या शाक्त राज्याभिषेक सोह्ल्याचे आयोजन करण्यात आले आहे..तरी शिवप्रेमिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
जेष्ठ पत्रकार अभ्यासक सुधाकर लाड ह्यांचा शाक्त शिवराज्याभिषेकासंबंधी लेख येथे देत आहोत.

Monday, June 7, 2010

shivrajyabhishek 6 june 2010,raigad

शिवराज्याभिषेक सोहळा यापुढे राष्ट्रीय सण - तटकरे


छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत असून त्यांचा राज्याभिषेक सोहळा यापुढे राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी केली. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत संभाजीराजे यांच्या हस्ते तसेच हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. याचवेळी बोलताना शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचे जेवढे किल्ले आहेत, त्या किल्ल्यांवर महाराजांचे उत्सव साजरे करण्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या परवानगीची अजिबात गरज नसून प्रत्येक किल्ल्यावरील दगडधोंडे ,मातीमध्ये शिवभक्तांच्या भावना गुंतल्या असल्याने त्यांच्याशी खेळू नका अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील ,असा इशारा दिला.अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत संभाजीराजे यांच्या हस्ते तसेच हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. गेले दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रांतून शिवभक्त गडावर डेरेदाखल झाले होते. शनिवारी दुपारपासून राज्याभिषेक सोहळय़ानिमित्त विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती श्रीमंत संभाजीराजे यांच्या हस्ते महाराजांची विधीवत पूजा, अभिषेक करण्यात आल्यानंतर सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात आला.
पानिपत येथे पुरुषोत्तम खेडेकर ह्यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा
- मराठा सेवा संघातर्फे यंदा सहा जूनला कालाआम-पानीपत (हरियाना) येथे 336 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये शिवराज्याभिषेक रायगडावर करण्यात आला होता. त्या स्मृतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन येते.
यावर्षी हा कार्यक्रम पानीपत येथे होणार आहे. कार्यक्रमास हरियानाचे मुख्यमंत्री भुपेद्रसिंग हूड्डा, स्थानीक नेते विरेंद्रवर्मा यांची प्रमूख उपस्थिती या कार्यक्रमास लाभेल. महाराष्ट्रातून या सोहळ्यास अनेक जण सहभागी होणार आहे. ज्यांना या सोहळ्यास उपस्थित राहायचे असेल त्यांनी डॉ. शिवाजी झांबोडे (09812063521), डॉ. मांगेरामजी चोपडे (09215350516) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्याने रायगडाला आली पुन्हा जाग!




रायगड - शिवभक्तांच्या भावनांशी खेळाल, तर पुरातत्त्व खाते गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिला. शिवछत्रपतींच्या कोणत्याही गडावर उत्सव साजरा करण्यासाठी यापुढे परवानगी मागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा झाला. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी शिवराज्याभिषेक सोहळ्यास केंद्र सरकारकडून परवानगी मिळवून आणल्याबद्दल युवराज संभाजीराजे छत्रपती यांना तमाम शिवभक्तांतर्फे श्री. ठाकरे व राज्याचे अर्थमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते चांदीची तलवार देऊन गौरविण्यात आले. तसेच ठाकरे यांच्या हस्ते समितीचे अध्यक्ष इंद्रजित सावंत यांच्या "प्रतापगडाची जीवनगाथा' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या वेळी गडावरील राजदरबार जय भवानी जय शिवाजी जयघोषाने दणाणून गेला. ठाकरे म्हणाले, "पुरातत्त्व खात्याने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी परवानगी नाकारली आणि तमाम शिवभक्तांनी खात्याला सडेतोड उत्तर दिले. वाघाला डिवचण्याची हिंमत कराल तर हे असेच होणार. पुरातत्त्व खात्याने रखवालदाराचे काम करावे. मालकाचा आव आणू नये. शिवभक्तांच्या भावनांशी खेळण्याचा नाहक उद्योगही करू नये.'' ते म्हणाले, ""ज्यांनी अफझलखानाचे पोट फाडले, शाहिस्तेखानाची बोटे तोडली, औरंगजेबाला पळताभुई थोडी केली, त्या शिवछत्रपतींच्या सोहळ्यास परवानगी नाकारून, पुरातत्त्व खाते औरंगजेबाप्रमाणे वागत आहे. पुरातत्त्व खाते असेच वागणार असेल, तर अधिकाऱ्यांना गडावर फिरकूही देणार नाही. हिंमत असेल, तर अधिकाऱ्यांनी हे धाडस करून बघावे. गडावरील दगड, माती हे शिवभक्तांसाठी अमृतासमान आहे. त्यांच्या श्रद्धेला तडा जाऊ देऊ नका; अन्यथा टकमक टोक दाखविल्याशिवाय राहणार नाही.'' संभाजीराजे म्हणाले, "शिवराज्याभिषेक सोहळ्यात तारीख व तिथीचा वाद होणे चुकीचे आहे. शिवछत्रपतींचे कार्य जगभर पोचवायचे असेल, तर राष्ट्रीय सण म्हणून हा सोहळा सहा जूनला साजरा झाला पाहिजे. यंदा सोहळ्यास परवानगी नाकारल्याने, तमाम शिवभक्त संतप्त झाले होते; मात्र मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने सोहळा सुकर झाला.'' श्री. तटकरे म्हणाले, ""पुढच्या पिढीला शिवछत्रपतींचा इतिहास कळायला हवा. त्याकरिता तमाम शिवभक्तांच्या पाठबळावर सरकारच्या वतीने राष्ट्रीय सण म्हणून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास प्रयत्नशील राहणार आहे.'' मिशन रायगड ...युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले, ""रायगडाचे वैभव जपण्याकरिता रायगड मिशन सुरू करायला हवे. त्याची जबाबदारी मी स्वीकारतो. पर्यटनाला चालना देण्यासाठी रायगडाचे महत्त्व जगभर जाणे आवश्‍यक आहे; तसेच यापुढे शिवछत्रपतींची ओळख महामानव म्हणून करणे शिवभक्तांचे कर्तव्य आहे.'' या वेळी संभाजीराजे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज व प्रबोधनकार ठाकरे, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व स्वतःचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे स्पष्ट केले.




या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे`
सुनील पाटकर - सकाळ वृत्तसेवामहाड - "जय भवानी, जय शिवाजी'चा दुमदुमणारा जयजयकार.... अंगात स्फूर्ती जागविणारे बहारदार पोवाडे, शौर्याचे प्रतीक असलेले मर्दानी खेळ आणि हजारो शिवभक्तांचा लोटलेला सागर... रायगडावर जणू शिवकालच जिवंत झाला होता. शिवभक्तांच्या ओतप्रोत वाहणाऱ्या जल्लोषात रायगडावर रविवारी शिवराज्याभिषेक दिन उत्साहात पार पडला. रायगडही या उत्साहाने आणि शिवराज्याभिषेकाच्या त्या स्मृतींनी थरारला असेल. वादाच्या पार्श्‍वभूमीवर शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यास दिलेली परवानगी यामुळे आधीच शिवप्रेमींच्या उत्साहाचा सागर उसळला होता. ढगांनी आच्छादलेली चादर आणि पावसाने लावलेली हजेरी यातही शिवप्रेमींचा हाच उत्साह टिकून होता. कुंद धुक्‍यांनी नटून गेलेला रायगड पूर्णपणे शिवभक्तांनी ओसंडून गेला होता. शनिवारी सायंकाळपासून महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून आलेल्या शिवप्रेमींनी गडावर हजेरी लावली होती. पाचाड, रायगड रोपवे व रायगडचा पायथा हजारांहून अधिक वाहनांनी भरून गेला होता. वाहने वळविण्यासाठीही जागा नव्हती. चित्तदरवाजापासून कोल्हापूर, सातारा, अकोला, पुणे, मुंबई या भागातून आलेले शिवप्रेमी खांद्यावर भगवा झेंडा घेऊन शिवाजी महाराजांचा जयजयकार करत गड सर करत होते. रोपवेलाही गडावर जाण्यासाठी तुफान गर्दी होती. रायगड व परिसरात जेथे जेथे जागा मिळेल त्या त्या ठिकाणी शिवप्रेमींनी गटागटाने वास्तव्य केले होते. महाड शहराजवळील करंजखोलपासून रायगड किल्ल्यापर्यंतच्या 25 किलोमीटर अंतरामध्ये मंदिरे, समाज मंदिरे, सभागृह, खासगी घरे, मोकळी जागा अगदी गाडीतही शिवप्रेमींनी मुक्काम केला होता. रायगड किल्ल्यावर काल मध्यरात्रीच पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी राज्याभिषेक सोहळ्यापूर्वीही पाऊस हलकेच हजेरी लावून गेला. गांधारी नदी व परिसरातील नद्यांवर शिवप्रेमींची स्नानासाठी गर्दी झाली होती. पाचाड, रायगड परिसरातील हॉटेल्सही भरून गेली होती. काही जण छत्रपती शिवरायांच्या पोषाखात गडावर आले होते. त्यांना पाहून प्रत्यक्ष शिवकालातच असल्यासारखे भासत होते. मावळ्यांचा पोषाख केलेले, हाती तलवार व पाठीवर ढाल घेऊन चालणारे शिवप्रेमी आणि पारंपरिक वेष धारण केलेल्या महिलांचीही कमतरता नव्हती. गडावर चौघडे झडत होते. ढोल-ताशे वाजत होते. अनेक ठिकाणांहून आलेली वाद्यपथके होळीच्या माळावर बेभान होऊन वाद्ये वाजवत होती. राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी शाहिरांनी सादर केलेल्या पोवाड्यांना शिवप्रेमींनी मोठी दाद दिली. "अंधार झाला आता, दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे' या शाहिरी गीतावर शिवप्रेमी उत्साहाने नाचू लागले. सकाळी 5.30 वाजता ध्वजारोहणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. छत्रपती संभाजीराजांच्या प्रमुख उपस्थितीत शिवमूर्तीची पालखी वाजत गाजत राजदरबारात आणण्यात आली. या ठिकाणी संभाजी राजांच्या हस्ते शिवमूर्तीवर सुवर्ण नाण्यांचा व जलाचा अभिषेक करण्यात आला. यानंतर उद्धव ठाकरे यांचे आगमन होताच गडावर चैतन्य पसरले. शिवप्रेमींनी उत्साहात त्यांचे स्वागत केले. याप्रसंगीं अर्थमंत्री सुनील तटकरे, परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व कमांडोच्या वेषात आलेले आमदार वंजाळे, आमदार भरत गोगावले, इंद्रजीत सावंत, मुंबईच्या महापौर श्रद्धा जाधव उपस्थित होते. राज्याभिषेक सोहळ्यानंतर संभाजी राजांच्या उपस्थितीत शिवरायांची पालखी जगदिश्‍वर मंदिराकडे नेण्यात आली. या वेळी शिवप्रेमींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.





सरकारच्या निर्णयाचे संभाजी ब्रिगेडकडून स्वागत
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 02, 2010 AT 07:18 PM (IST)
पुणे - रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर संभाजी ब्रिगेडने आंदोलन मागे घेतले. फटाके वाजवून आणि पेढेवाटप करून निर्णयाचे स्वागत करण्यात आले. केंद्रीय पुरातत्त्व विभागाने सर्व ऐतिहासिक स्थळांवर कार्यक्रम करण्यास मनाई केली आहे. या निर्णयाविरुद्ध आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरोधात 'संभाजी ब्रिगेड'तर्फे धरणे आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली. जंगली महाराज रस्त्यावरील पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयासमोर सकाळी दहा वाजता हे आंदोलन सुरू झाले. या वेळी जिजाऊ ब्रिगेडच्या सारिका भोसले, शांताराम कुंजीर, संजयसिंह शिरोळे, संतोष शिंदे, प्रशांत धुमाळ, ज्योतिबा नरवडे आदी उपस्थित होते.दरम्यान, राज्य सरकारने रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा करण्यास परवानगी दिली. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. उशिरा का होईना, पण लोकभावनेचा आदर करून निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन करण्यात आले. फटाके वाजवून आणि पेढे वाटून आंदोलनाचा समारोप करण्यात आला.





शिवराज्याभिषेक साजरा करणारच..
सकाळ वृत्तसेवा
Monday, May 31, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: shivrajyabhishek, shivsena, kolhapur, western maharashtra
कोल्हापूर - केंद्र आणि राज्य शासनाला सांगली-मिरज दंगलीची पुनरावृत्ती होऊ नये असे वाटत असेल, तर रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी घातलेली बंदी त्वरित उठवावी. अन्यथा कोणत्याही परिस्थितीत सोहळा साजरा केला जाईल, असा इशारा शहर -जिल्हा शिवसेनेतर्फे आज देण्यात आला. बंदीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेने आज सकाळी जोरदार निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांना निवेदन दिले.केंद्र शासनाच्या पुरातत्त्व खात्याने तीस मार्चच्या निर्णयानुसार रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास परवानगी नाकारली आहे. त्याचे पडसाद शिवप्रेमींमध्ये उमटू लागले असून आज शहर व जिल्हा शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून संताप व्यक्त केला. केंद्र, राज्य शासन व पुरातत्व खात्याच्या निषेधाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. केंद्र शासन महाराष्ट्राबद्दल नेहमीच आकसाने वागत असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम माहीत नसणाऱ्या अधिकाऱ्यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याला परवानगी नाकारली आहे. महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचा आकस त्यांनी दाखवून दिला आहे. वर्षानुवर्षे रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. हजारो शिवप्रेमी रायगडावर जमतात. असे असताना त्यांच्या भावना दुखवण्याचे धाडस केंद्र शासनाने केले आहे. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यांच्याच सोहळ्याला बंदी घालणे हे दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया या वेळी व्यक्त करण्यात आल्या. प्रतापगडावर अफझलखानचा ऊरूस साजरा केला जातो. त्याला बंदी घातली जात नाही, पण छत्रपतींच्या कार्यक्रमावर बंदी घालून अन्याय केला जात आहे. शासनाने घातलेली ही बंदी मागे घेऊन शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास परवानगी द्यावी. अन्यथा पोलिसच काय, सैन्य दल बोलावले तरी रायगडावर सोहळा साजरा केला जाईल. पुरातत्व खात्याने रायगडावर सोहळ्यास परवानगी नाकारली आहेच शिवाय ऐतिहासिक वास्तूपासून शंभर मीटर अंतरावर कोणताही फेरफार करू नये, तसेच महाराष्ट्रातील अन्य कोणत्याही किल्ल्यावर कार्यक्रम करण्यास मनाई केली आहे. त्याचा निषेध करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हा जुलमी आदेश त्वरित मागे घ्यावा अन्यथा कायदा मोडून रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाईल, असा इशाराही त्यात दिला आहे.आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, मुरलीधर जाधव, विजय देवणे, प्रा. विजय कुलकर्णी यांच्यासह अनेक शिवसैनिक निदर्शनात सहभागी झाले होते.

Wednesday, June 2, 2010

रायगडावर होणारच शिवराज्याभिषेक सोहळा !!!


रायगडावरील शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याला पंतप्रधान कार्यालयाने आज (बुधवार) परवानगी दिली. यासंदर्भातील अनुमतीचे पत्र आजच पंतप्रधान कार्यालयातून आल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या साप्ताहिक बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 1958च्या कायद्यानुसार पुरातत्व खात्याच्या अधिक्षकांकडे परवानगीचे अधिकार होते. मात्र, या कायद्यात बदल झाल्याने ते अधिकार केंद्र सरकारला प्राप्त झाले. त्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी केंद्र सरकारची अनुमती आवश्‍यक होती असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रायगडावरील शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याला परवानगी मिळण्याबाबत कालच पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिण्यात आले होते तसेच दूरध्वनीद्वारे चर्चादेखील केली होती. त्याला अनुसरून पंतप्रधान कार्यालयातून या सोहळ्याला अनुमती देण्यात आल्याचे पत्र आज मिळाले अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यापुढे दरवर्षी 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा साजरा करण्यासाठी कायमस्वरूपी अनुमती असावी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार असून त्यामुळे या सोहळ्यासाठी दरवर्षी परवानगी घेण्याचा प्रश्‍नच निर्माण होणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रायगडावर येत्या सहा जूनला होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास पुरतत्वविषयक कायद्यातील बदलांमुळे बंदी आली होती. पुरातत्त्व खात्याच्या निर्णयाचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटू लागले होते. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाच्या निषेध करीत राज्याभिषकाचा सोहळा रायगडावर पार पाडण्याचा निर्धार व्यक्त करीत, सरकारला आव्हान दिले होते. शिवभक्त दरवर्षी मोठ्या उत्साहाने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतात. यंदाही समितीतर्फे सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे, पण पुरातत्त्व खात्याच्या निर्णयामुळे शिवभक्त सैरभैर झाले होते.राज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात केंद्रसरकारशी चर्चा करून या सोहळ्यासाठी परवानगी मिळवून देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी काल (मंगळवार) "सकाळ'शी बोलताना दिली होती.

पंतप्रधानांशी चर्चा करून राज्याभिषेकाला परवानगी देऊ - मुख्यमंत्री
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 02, 2010 AT 12:19 AM (IST)
मुंबई - रायगडावरील शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात केंद्रसरकारशी चर्चा करून या सोहळ्यासाठी परवानगी मिळवून देवू अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज दै. सकाळशी बोलताना दिली. मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, दरवर्षी राज्याभिषेकाचा सोहळा होतो. तसा व्हायला काही हरकत नाही. राज्यभिषेक व्हावा ही मागणी काही चुकीची आहे, असे मला वाटत नाही. त्यात काही आक्षपार्ह आहे, असेही मला वाटत नाही. परंतू केंद्राच्या कायद्याच्या अखत्यारित हा प्रश्‍न आलेला आहे. त्यामुळे मी स्वतः पंतप्रधान कार्यालयाशी या संदर्भात चर्चा करीन आणि राज्याभिषेक सोहळ्याला परवानगी मिळवून देण्याचा प्रयत्न करीन, अशी सकारात्मक प्रतिक्रिया त्यांनी दिली. केंद्रीय पूरातत्व खात्याने रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरातील शिवाजी पेठेत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. पुरातत्व विभागाच्या या निर्णयाच्याविरोधात तीव्र लढा उभारण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी या निर्णयाचा निषेध करीत राज्याभिषेकाचा सोहळा रायगडावरच पार पाडण्याचा निर्धार व्यक्त सरकारला आव्हान दिले आहे.

Friday, February 19, 2010

shivrajyabhisheks


a new photo shivrajyabhishek....